Ratangad  Akole Maharashtra Treak 

रतनगड किल्ला माहिती मराठी 

 

forest view

     रतनगड हा ८व्या शतकातला गड आहे. गडाची उंची ही ४२५० फुट आणि मीटर मध्ये १२९५.४ मीटर इतकी आहे. रतनगडावर चढण्याचे दोन मार्ग आहेत एक म्हणजे साम्रद गाव  आणि  दुसरं म्हणजे  रतनवाडी.  साम्रद ह्या गावामधून गड चढत असताना आपल्याला भव्ये असे जंगल लागेल डोळ्याचे पारणे फेडणारे दुश्य आपल्याला तिथे अनुभवायला मिळेल








आणि  तिथून पुढे गेल्यावर समोर आपल्याला गडाच्या कडेने असलेल्या रस्त्याने जाव लागेल , काही समोर काही चढाची जागा लागेल काही अरुंद रस्ते लागतील, ह्या अश्या रस्त्याने आपल्याला काळजीपूर्वक चढाई करावी लागते . नाहीतर पाय घसरण्याची शक्यता दाटते, म्हणून ट्रेक ला येतांनी  ( ruber grip shoes) चा वापर करावा ज्यामुळे आपल्याला ट्रेक करायला सोप जाईल. आणि तिथून पुढे गेल्यावर आपल्याला दिसतात त्या भव्य अश्या उभ्या दिसणाऱ्या पायऱ्या. ज्या काही ठिकाणी तुटलेल्या आहेत आणि म्हणून इथेही चढत असताना काळजी घ्यावी लागते. जर आपण पावसाल्य मध्ये ट्रेक ला  जात असाल तर खूपच काळजी घ्यावी लागणार आहे. कारण पायऱ्या वरून पाय घासनारच जर shoes तुमचे चांगले नसतील तर म्हणून सांगतो की पूर्ण तय्यारी करूनच तुम्ही ट्रेकसाठी या इथे.

  • पुढे आपण काही पायऱ्या  चढल्यानंतर समोर जे आपल्या डोळ्याला दिसेल ते असेल भव्य असे त्रंबक दरवाजा. अतिशय शिवकालीन काळातील दृश्य आपल्याला इथे बघायला मिळेल. इथून चालू होईल आपल्या रतनगड ची रचना. 
TRAMBAK DOOR ( त्रंबक दरवाजा )

आणि आपण थोडंसं अजुन पुढे चालत गेलो असता आपल्याला समोर अजुन एक अरुंद रस्ता दिसेल त्या रस्त्याने काळजीपूर्वक या . हा रस्ता पार केल्यावर आपल्याला दिसेल ते डोळ्यांना मनमोहन करणारे दृश्य म्हणजेच नेढे  (सूईचा डोळा) ह्याच डोंगराला पडलेल्या बोगद्याला  नेढे  म्हणजे सुईचा डोळा असे ह्यामुळे म्हणतात की  तिथं निसर्गामुले डोंगराला सुईच्या मागच्या दिशेने असलेल्या नेढ सारखा आकार आहे.  म्हणून त्याला सूईचा नेढ व सुईचा डोळा अस म्हणतात.आणि  इथून आपल्याला मागच्या दिशेने अलंग, मदन, कुलंन हे गड दिसतील आणि समोर च्या दिशेन महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर  कळसुबाई शिखर दिसेल.(कळसूबाई शिखर अधिक महिती  rajbloginindia.blogspot.com



NEDHE (सुईचा डोळा ) 

insta@rajesh.kanade.988

VIDEO LINK

TOP OF THE RATANGAD 


तिथून खाली एक रस्ता आहे तो सरळ खालच्या दिशेने  आहे थोडासा तर सांभाळून, खाली आल्यावर दिसेल ७ पाण्याच्या  टाक्या . त्यावेळेला  गडाच्या सुरक्षेचा विचार करता तिथे पाण्याचा आणि अन्न धान्याचा भरपूर प्रमाणात साठा करून ठेवण्यात आला होता, येवढा  की तो साठा तिथे राहणाऱ्यां मावळ्यांना तो साठा वर्षभर पुरेल असा होता. 



WATER TANK ON RATANGAD



HIDDEN WATER TANK